मार्क मिळवण्यासाठी मर मर मरतात,
क्लासेसच्या प्रचंड फिया भरतात,
तरीसुद्धा रिझल्टच्या वेळी भलतेच घाबरतात,
आम्ही मात्र लहानपणीच विकली होती लाज,
वेगळं काहीतरी करण्याची होती मात्र खाज,
लेक्चर बंक करण्याचा होता वेगळाच माज,
प्रॅिक्टस के नाम पे चलता अपना राज.
गाण्याच्या नावाखाली केली जाम मजा,
होमवर्क न करताही मिळाली नाही सजा,
वर्गात बसून बोर होण्यासारखा दिन नसे दुजा.
असं सगळं असताना मग तुम्ही घेताय काय रजा!
गप्पा टाइमपास मस्ती यात जायचा वेळ,
अन मधल्या सुट्टीत, रग्बीचा खेळ.
रीसेसच्या आधी डब्ब्यातल्या पोळ्या,
अन रीसेस नंतर... टिनी-मिनीच्या गोळ्या.
वर्गात कोंडून ठेवलेल्या प्राण्यांना,
वर्गाबाहेर वाटे जंगल
लास्ट पिरीयेडला लाईट गेले कि,
वंदे मातरम म्हणायची दंगल.
शाळा सुटली की शाळेवरचं दिसून येत प्रेम,
ग्राउंडवरती होयचे फुटबॉलचे १-२ गेम,
वडेवालीच्या नाक्या वरती होयच्या गप्पा "लेम"
दिवस संपण्याचा असं होता आमचा नेम.
एवढा सगळं करुनही ,
झालो दहावी पास,
काही जणांची कामगिरी तर
होती भलतीच खास.
दहा वर्षां पूर्वीचे ते
सारे सोनेरी क्षण,
हातात न राहणारे
रेतीचेच जणू कण...
No comments:
Post a Comment