Sunday, October 24, 2010

ती

तिच्या मनात होता वेगळंच काही,
मला मात्र ते जरासुद्धा समजलं नाही...
धुंडाळत फिरलो मी दिशा दाही,
ती हसून माझे माकडचाळे पाही...
वास्तव समजल्यावर मात्र झाली मनाची लाही लाही,
वेळ सावरून घेण्याचा तिचा थाट होता शाही...
तिच्या खंबीरपणाचीच होती जणू ग्वाही,
खट्याळ खोडकर हीच का ती, असा प्रश्न पडून राही...