तुझ्या त्या आठवणी,
जश्या धुळीतील हिरकणी.
माती झालेल्या वेळेत पुसट झाल्यात फार,
आठवल्यावर मात्र मनाला बोचरे वार.
तुझा ते लाडिक हसणं,
किंवा छोट्या गोष्टीवरून रुसणं,
सगळी होती कारणं करून घ्यायला लाड,
पण हे सगळा करताना कधीच न्हाव्तीस द्वाड.
आठवतंय का जेव्हा चौपाटीवर पाणी होता खळाळत,
आणि त्याहून गोड तुझे हास्य होते सलाळत...
माझ्या पूर्ण जीवनाचा तूच होतीस पाया,
तुझाशिवाय आता पूर्ण आयुष्य जातंय वाया...
माझ्याकडे परत येशील का ग राणी?
पुन्हा आपण दोघं मिळून गाऊ का मंगल गाणी???